जळगाव - जिल्ह्यात सोमवारी नव्याने 312 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 10 हजार 44 झाली आहे. सर्वाधिक 63 कोरोबाधित रुग्ण हे जामनेर तालुक्यात आढळून आले आहेत. दिवसभरात 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, सोमवारी दिवसभरात 214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा -राज्यात प्रथमच पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त, ८ हजार ७०६ कोरोनामुक्त
जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. यात सोमवारी नव्याने 312 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात सोमवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 41, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 10, अमळनेर 25, चोपडा 26, पाचोरा 8, भडगाव 11, धरणगाव 14, यावल 10, एरंडोल 3, जामनेर 63, रावेर 13, पारोळा 17, चाळीसगाव 43, मुक्ताईनगर 13, बोदवड 1 व इतर जिल्ह्यातील 3 अशी रुग्णसंख्या आहे. सोमवारी दिवसभरात 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव, अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी 1 याप्रमाणे 2 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील 6 हजार 505 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. सोमवारी 214 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता 3 हजार 70 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील 469 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 90 मृत्यू हे जळगाव शहरात झाले आहेत.
महाराष्ट्रात प्रथमच दिवसभरात नव्या पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त
राज्यात प्रथमच आज(सोमवार) कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली. आज ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर, ७ हजार ९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार ९४४ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ नमुन्यांपैकी ३ लाख ८३ हजार ७२३ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २२ हजार ६३७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार १३६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.