जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. सोमवारी जिल्ह्यात पुन्हा 205 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 6 हजारांच्या पार गेली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्णसंख्या 6 हजार 167 इतकी झाली आहे. सोमवारी जिल्ह्यातील 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यातील जळगाव शहरासह भुसावळ आणि अमळनेर तालुक्यात प्रशासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन 14 जुलैपासून सशर्त हटविण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाला सोमवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण 205 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 56, जळगाव ग्रामीण 9, भुसावळ 16, अमळनेर 8, चोपडा 9, पाचोरा 6, भडगाव 1, धरणगाव 22, यावल 7, एरंडोल 23, जामनेर 5, रावेर 11, पारोळा 15, चाळीसगाव 4, मुक्ताईनगर 7, बोदवड 5 तसेच अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात सोमवारी देखील सर्वाधिक 56 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जळगावातील रुग्णसंख्या आता 1 हजार 476 इतकी झाली आहे. जळगाव पाठोपाठ भुसावळ शहरात मोठी रुग्णसंख्या आहे. भुसावळात आतापर्यंत कोरोनाचे 571 रुग्ण आहेत.
हेही वाचा -राज्यात आज साडेसहा हजार नव्या रुग्णांची भर, १९३ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात सोमवारी 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू...