जळगाव -जिल्ह्यातील सुमारे २१ हजार शेतकरी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजने अंतर्गत संयुक्त खाते, अपूर्ण खाते क्रमांक, चुकीचा खाते क्रमांक आदी चुका असल्याने शेतकऱ्यांना या महत्त्वाकांक्षी योजनेच्या लाभापासून थांबविण्यात आले आहे.
हेही वाचा... बांग्लादेशात अल्पसंख्य सुरक्षितच, परराष्ट्र मंत्री मोमेन यांनी भारताचा दावा फेटाळला
शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे चौथ्या टप्प्यापासून लाभ देताना पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे पीएम-किसान पोर्टलवरील नाव व आधार कार्डवरील नाव एकसारखे असणे अनिवार्य आहे. जळगाव जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या ३ लाख ९४ हजार ४६६ लाभार्थ्यांपैकी १ लाख ३१ हजार ८३४ लाभार्थ्यांचे नाव आधारकार्डप्रमाणे पीएम-किसान पोर्टलवर आढळून आले नव्हते. या कामासाठी तलाठी यांच्याकडे ज्या नावाची दुरुस्ती करावयाची आहे, अशी यादी पुरवण्यात आली होती. लाभार्थ्यांनी त्यांच्या नावाची दुरुस्ती तलाठी यांच्यामार्फत करून घेतली. पोर्टलवरील नाव आधारकार्डप्रमाणे अद्ययावत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार लाभार्थ्यांचे नाव आधारकार्डप्रमाणे पीएम-किसान पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदवले आहे.