जळगाव -जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी सायंकाळी पुन्हा 20 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या 317 वर जाऊन पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आता कोरोनाने आपले स्थान बदलले आहे. जामनेर, यावल आणि धरणगाव तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यात मंगळवारी 20 कोरोनाबाधित रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 317
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 317 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे, तर आतापर्यंत 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल मंगळवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. यापैकी 25 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 20 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे 7, भुसावळ येथील 4, चोपडा येथील 1, जामनेर तालुक्यातील पळासखेडे येथील 1, यावल तालुक्यातील 2, सावदा शहरातील गांधीचौक येथील 2 तर जळगाव शहरातील पोलीस कॉलनीतील 2 व सिव्हील हॉस्पिटलमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच यापूर्वीच कोरोना बाधित असलेल्या भुसावळ, अमळनेर व जळगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचे पुनर्तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.