जळगाव -लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी व अत्यावश्यक सेवेच्या दुकानांव्यतिरीक्त इतर दुकाने उघडण्यास बंदी असतानाही पहाटे पाच वाजता फुले मार्केटमधील कपड्यांची दुकाने उघडून माल विक्री करणाऱ्या १५ दुकानांना गुरुवारी सील करण्यात आले. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे व मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने भल्यापहाटे ही कारवाई केली आहे. १५ दुकानांसह फुले मार्केटमधील २२ मोटारसायकल व २ चारचाकी वाहने देखील जप्त करण्यात आले आहेत.
पहाटे पाच वाजता दुकाने उघडून माल विक्री करणाऱ्या १५ विक्रेत्यांची दुकाने सील - जळगाव लॉकडाऊन न्यूज
१५ दुकानांसह फुले मार्केटमधील २२ मोटारसायकल व २ चारचाकी वाहने देखील जप्त करण्यात आले आहेत.
फुले मार्केटमध्ये पहाटे ४ वाजेच्या सुमारास व्यवसाय सुरू केले जात असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांना मिळाली होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी ४ वाजता उपायुक्त वाहुळे हे एकटेच पोहोचले. त्यानंतर त्यांनी पाहणी केल्यानंतर अनेक दुकाने सुरू असल्याचे आढळून आले. वाहुळे यांनी अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांना पथकासह कारवाईसाठी बोलावले. ५.३० वाजेपर्यंत मनपाचे पथक आल्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी एकेक दुकाने सील करण्याची मोहीम हाती घेत, सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण १५ दुकाने सील करण्यात आली.
मनपाचे पथक पोहचल्यानंतर धावपळ-