महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पंधराशे पार; सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांची शंभरी - Covid 19

काल (बुधवारी) देखील प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ११४ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापाठोपाठ आज तब्बल १३० नवीन रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Jalgaon
जळगांव जिल्ह्यात कोरोनाबधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

By

Published : Jun 11, 2020, 8:38 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दररोज वाढतच आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात दररोज शंभरपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहे. आज (गुरुवारी) देखील जिल्ह्यात तब्बल १३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आता १ हजार ५२६ इतका झाला आहे.

जिल्हा प्रशासनानला आज रात्री प्राप्त झालेल्या अहवालांनुसार १३० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी ११६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. काल (बुधवारी) देखील प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ११४ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापाठोपाठ आज तब्बल १३० नवीन रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २०, जळगाव ग्रामीण ०५, भुसावळ ०५, अमळनेर ०३, चोपडा ०५, पाचोरा ०३, भडगाव ०२, धरणगाव २२, यावल ०२, एरंडोल ०१, जामनेर १८, रावेर २१, पारोळा ०९, बोदवड ०४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १ हजार ५२६ इतकी झाली आहे.

कोरोना अपडेट्-

जळगाव शहर २८०
जळगाव ग्रामीण ४१
भुसावळ २८०
अमळनेर २१६
चोपडा ९९
पाचोरा ४१
भडगाव ८९
धरणगाव ७४
यावल ७०
एरंडोल ३९
जामनेर ७७
रावेर १०९
पारोळा ६७
चाळीसगाव १७
मुक्ताईनगर ११
बोडवद १२
दुसऱ्या जिल्ह्यातील ४
एकूण १५२६

ABOUT THE AUTHOR

...view details