जळगाव -जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुके कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. पाचोरा पाठोपाठ आता शेजारील भडगाव तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने व्हायला सुरुवात झालीय. जिल्हा प्रशासनाला सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 13 संशयित रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 279 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर या ठिकाणांहून स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज सकाळी प्राप्त झाले आहेत. यापैकी 35 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगावचे 12 तर भुसावळ येथील एकाचा समावेश आहे. पुन्हा 13 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 279 झाली आहे.
भडगावातही उद्रेक होण्याची भीती