जळगाव - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडण्यास पूर्णपणे बंदी आहे. मात्र, तरीही शहरातील अनेक दुकानदार जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. मंगळवारी (४ मे) देखील बळीराम पेठ भागातील अनेक दुकानदारांनी लपून छपून व्यवसाय सुरू ठेवला होता. महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने या भागात जाऊन तब्बल ११ दुकाने सील केली. प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला.
जळगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकीकडे वाढत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी नागरिक व व्यावसायिकांकडून होताना दिसून येत नाही आहे. बाजारात दररोज गर्दी होत असून, प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसार सकाळी ११नंतही अनेक व्यावसायिक आपली दुकाने लपून छपून सुरूच ठेवत आहेत. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी मुख्य बाजारपेठ परिसरात पाहणी केली असता नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
बाहेरून शटर बंद, आत व्यवसाय सुरू -