महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमळनेरात फडकला १०० फुटी तिरंगा! - 75th independence day

जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर शहरात नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १०० फूट तिरंग्याचे अनावरण करण्यात आले.

amalner
अमळनेरात फडकला १०० फुटी तिरंगा

By

Published : Aug 15, 2021, 1:33 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर शहरात नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १०० फूट तिरंग्याचे अनावरण करण्यात आले. शहरवासीयांच्या मनात देशप्रेमाची भावना रुजावी, या उद्देशाने नगरपरिषदेच्या वतीने तिरंगा चौकात हा ध्वज उभारण्यात आला आहे.

अमळनेरात फडकला १०० फुटी तिरंगा!

रविवारी सकाळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने १००.३ फूट स्तंभाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, स्मिता वाघ, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित हजर होते.

ABOUT THE AUTHOR

...view details