महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबई-भुसावळ पॅसेंजरसह १० गाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून कल्याण ते कसारा मार्गावर टिटवाळा येथे पादचारी पुलाच्या गर्डरचे(आधाराचे खांब) काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने अप आणि डाऊन मार्गावरील मुंबई-भुसावळ पॅसेंजरसह १० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. इतर पाच गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

Railway Mega block
रेल्वे मेगा ब्लॉक

By

Published : Mar 13, 2020, 10:00 AM IST

जळगाव - मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून कल्याण ते कसारा मार्गावर टिटवाळा येथे पादचारी पुलाच्या गर्डरचे (आधाराचे खांब) काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने अप आणि डाऊन मार्गावरील मुंबई-भुसावळ पॅसेंजरसह १० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. इतर पाच गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. १३ आणि १४ मार्चला रात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून भूसावळ रेल्वे जंक्शन वर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

मेगा ब्लॉकमुळे मुंबई-भुसावळ पॅसेंजरसह १० गाड्या रद्द

रद्द करण्यात आलेल्या गाड्या -

  • गाडी क्रमांक १७६१२ डाउन मुंबई-नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस १४ मार्च
  • गाडी क्रमांक १७६११ अप नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस १३ मार्च
  • गाडी क्रमांक १२११७ अप मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस १४ मार्च
  • गाडी क्रमांक १२११८ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस १४ मार्च
  • गाडी क्रमांक १२११२ अप अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १३ मार्च
  • गाडी क्रमांक १२१११ डाउन मुंबई-अमरावती एक्स्प्रेस १४ मार्च
  • गाडी क्रमांक ११४०२ अप नागपूर-मुंबई एक्स्प्रेस १३ मार्च
  • गाडी क्रमांक ११४०१ डाउन मुंबई-नागपूर एक्स्प्रेस १४ मार्च
  • गाडी क्रमांक ५११५४ अप भुसावळ-मुंबई पॅसेंजर १३ मार्च
  • गाडी क्रमांक ५११५३ डाउन मुंबई-भुसावळ पॅसेंजर १४ मार्च

गाडी क्रमांक ११०६२ अप मुजफ्फरपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस १२ मार्चला जळगाव-वसई मार्गाने गेली. गाडी क्रमांक ११०५८ अप अमृतसर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस १२ मार्चला मनमाड-दौंड मार्गे गेली. गाडी क्रमांक १२५४१ अप गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस १२ मार्चला जळगाव-वसई मार्गाने गेली. गाडी क्रमांक ११०१६ अप गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस १२ मार्चला मनमाड-दौंडमार्गे गेली. गाडी क्रमांक ११०२५ अप भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस १४ मार्चला मनमाड-दौंड या मार्गे जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details