महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत रेल्वेखाली येऊन युवकाचा मृत्यू - hingoli news update

रेल्वे पटरी ओलांडताना तिरुपती ते अमरावती या सुपरफास्ट एक्स्प्रेस खाली आल्याने, मृत्यू झाल्याची नोंद हिंगोली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रेल्वेखाली येऊन युवकाचा मृत्यू
रेल्वेखाली येऊन युवकाचा मृत्यू

By

Published : Dec 14, 2020, 2:27 AM IST

हिंगोली - येथील रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर असलेल्या साई मंदिराच्या पाठीमागे रेल्वेखाली येऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. युवकाच्या शरीराचे मोठ्याप्रमाणात तुकडे झाल्याने, तुकडे वेचण्याची वेळ येऊन गाठोडे बांधून शवविच्छेदनासाठी नेण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

विशाल सखाराम थिट्टे (२३) रा. भंडारी ता. सेनगाव हल्ली मुक्काम औरंगाबाद, असे मयत युवकाचे नाव आहे. विशाल हा हिंगोली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सखाराम थिट्टे यांचा मुलगा आहे. विशाल दोन दिवसांपासून घरातून बेपता होता. त्याचा नातेवाईकांनी बराच शोध घेतला, मात्र तो कुठेही मिळून आला नाही.

रेल्वे पटरीवर आढळला मृतदेह-

विशाल हा घरातून गायब असल्याने त्याचा नातेवाईकांनी बराच शोध घेतला. मित्र मंडळींकडे देखील विचारणा करण्यात आली मात्र कुठे तो आढळून आला नाही. तर रेल्वे पटरीवर एका युवकाचा रेल्वे खाली येऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाहणी केली असता, त्याच्या कपड्यावरून ओळख पटली.

हिंगोली शहर पोलीस ठाण्यात नोंद-

रेल्वे पटरी ओलांडताना तिरुपती ते अमरावती या सुपरफास्ट एक्स्प्रेस खाली आल्याने, त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद हिंगोली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर पुढील तपास उप-निरीक्षक टाले हे करीत आहेत.

हेही वाचा-लग्नाहून घरी परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला; ट्रक-ऑटोच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार

ABOUT THE AUTHOR

...view details