महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हेडफोनचा बळी..! हिंगोलीच्या युवकाचा परभणीत अपघाती मृत्यू - headphone

विवाह समारंभ आटोपल्यानंतर भैया हा दुचाकीवर कानात हेडफोन घालून मामाच्या गावी परत जात होता. परभणी पासून काही अंतरावर गेल्यानंतर भैयाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

मृत भैय्या संजय सिरसाठ

By

Published : Apr 30, 2019, 7:55 AM IST

हिंगोली - गाडी चालवत असताना आजकाल कानात हेडफोन घालून मोठ्याने गाणी ऐकायची सवय तरुणाईला लागली आहे. याच सवयीमुळे भैय्या संजय सिरसाठ (वय २४, राहणार माहेरखेडा जि. हिंगोली) याचा अपघातात मृत्यू झाला आहे.

भैय्या माहेरखेडा येथील रहिवासी आहे. तो पाथरी येथे आपल्या मामाच्या गावी शिक्षणानिमित्त राहतो. मामाच्या मुलाचा परभणी येथे विवाह सोहळा होता. विवाह समारंभ आटोपल्यानंतर भैया हा दुचाकीवर कानात हेडफोन घालून मामाच्या गावी परत जात होता. परभणी पासून काही अंतरावर गेल्यानंतर भैयाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. धडकेमुळे जखमी अवस्थेत भैय्या रस्त्याच्या कडेला जावून पडला. रात्रीची वेळ असल्याने जखमी अवस्थेत पडलेल्या भैय्याला मदत मिळू शकली नाही.

घटनेची माहिती मिळताच परभणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना भैय्याच्या कानात हेडफोन आढळून आला. परभणी येथील जिल्हासामान्य रुग्णालयात भैय्याला उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी भैयाला तपासून मृत घोषित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details