महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत युवक काँग्रेस व काँग्रेस विद्यार्थी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दाखल झाली. युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटने (एनएसयुआय) च्यावतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखवून कार्यकर्त्यांनी पलायन केले.

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवताना कार्यकर्त्ये

By

Published : Aug 30, 2019, 11:10 PM IST

हिंगोली -जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दाखल झाली. युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटने (एनएसयुआय) च्यावतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखवून कार्यकर्त्यांनी पलायन केले.

युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटने (एनएसयुआय) च्यावतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले
हिंगोली शहरात पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. मात्र, मुख्यमंत्री जवळा बाजार येथील सभा संपवून हिंगोली शहरात दाखल होत असताना हा प्रकार घडला. सध्या मराठवाड्यातील शेतकरी निसर्गासमोर हतबल आहे. दिवसेंदिवस त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. हे सरकार कर्ज माफी झाल्याची घोषणा करत आहे. प्रत्यक्षात मात्र कर्ज माफी झालीच नाही. सरकार रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा करत असताना बेरोजगारी मात्र वाढतच आहे. शिवाय पीक विम्याच्या नावाखाली वीमा कंपन्यांची घरे भरली जात आहेत. मागील काही वर्षांपासून शिक्षक भरती देखील केली नाही, अशा असंख्य प्रश्नांमुळे युवक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजादेश यात्रेला काळे झेंडे दाखवले.झेंडे दाखवलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details