देवरी तालुक्यात विवाहित युवकाची गळफास लाऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट - देवरी तालुका
मेशचे तीन वर्षापूर्वी देवरी तालुक्यातीलच मुल्ला येथील मुलीशी लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या एक वर्षानंतर घरगुती भांडनामुळे ते पतीपत्नी विभक्त राहत होते. शनिवारी रात्री गावातील एका लग्नाच्या कार्यक्रमातही तो उपस्थित होता. मात्र सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले।
गोंदिया - जिल्ह्यातील देवरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गोटिटोला सिंदीबीरी गावात एका विवाहित युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रमेश नानू पुराम (वय ३५)असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्ये कारण अस्पष्ट आहे.
सिंदीबीरी येथील रमेश याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडावर शनिवारी रात्रीच्या वेळेस दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी लहान मुले आंबे तोडायला गेली असता, ही घटना उघडकीस आली. त्या लहान मुलांनी तत्काळ या घटनेची माहिती गावाकऱ्यांना दिली. रमेशचे तीन वर्षापूर्वी देवरी तालुक्यातीलच मुल्ला येथील मुलीशी लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या एक वर्षानंतर घरगुती भांडनामुळे ते पतीपत्नी विभक्त राहत होते. शनिवारी रात्री गावातील एका लग्नाच्या कार्यक्रमातही तो उपस्थित होता. मात्र सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास चिचगड पोलीस करीत आहेत.