हिंगोली -शहरातील भाजप कार्यालयासमोर रक्तस्त्राव होत असलेल्या अवस्थेत एक तरूण आढळून आला. अति रक्तस्राव झाल्यामुळे त्याच्या हालचाल होत नव्हती. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत घटनेची माहिती पोलिसांना दिली. शहर पोलीस ठाण्याचे शेख काजी यांनी या तरुणाला खाजगी वाहनातून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याना हालचाल दिसून आली. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून या तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. त्याची अवस्था इतकी गंभीर होती की त्याला स्वतःचे नाव देखील सांगता येत नव्हते.
हिंगोली: नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे अत्यवस्थ तरुणाला मिळाले नवे आयुष्य - जिल्हा सामान्य रुग्णालय
हिंगोली शहरातील भाजप कार्यालया बाहेर एक तरुण तासभर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अति रक्तस्त्राव झाल्यामुळे तरुण बेशुद्ध पडला होता. तरुण बेशुद्ध पडल्याने घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी भीती व्यक्त केली. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती
हिंगोली शहरातील भाजप कार्यालया बाहेर एक तरुण तासभर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अति रक्तस्त्रास झाल्यामुळे तरुण बेशुद्ध पडला होता. तरुण बेशुद्ध पडल्याने घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी भीती व्यक्त केली. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. रुग्णवाहिकेला फोन करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. अखेर शहर पोलीस ठाण्याचे काजी यांनी एका खाजगी वाहनातून या तरुणाला जिल्हासामान्य रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, हा तरुण इतका गंभीर कसा झाला? त्याच्यावर कुणी हल्ला केला की, कोणत्या वाहनाने त्याला धडक दिली. याचा शोध शहर पोलीस घेत आहेत. गंभीर असलेला युवक शेख खाँजा एवढेच नाव सांगत आहे.