हिंगोली - पुराच्या पाण्यात कोणी अडकले किंवा वाहून जात आहे अशी माहिती मिळताच धावून जाणाऱ्या मित्र मंडळात सहभागी झालेल्या एका तरुणाचा आज पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह उसाच्या फडात सापडला. लखन प्रकाश गजभारे ( वय -२३ रा. येलकी ता. कळमनुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा -बेळगावमध्ये मराठी माणसाचा विजय तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव - फडणवीस
पुरातून वाहून जाणाऱ्यांना अनेकवेळा लखनने वाचवले आहे. परिसरात मदतीसाठी त्याने मित्रमंडळ देखील तयार केले आहे. पुराच्या पाण्यात कोणी वाहून गेल्याची माहिती मिळताच हे मित्रमंडळ घटनास्थळी धाव घेऊन ताबडतोब मदत करतात. कळमनुरी तालुक्यातील येलकी येथे गावाजवळच असलेल्या ओढ्यात वाहून गेल्याने लखनचा मृत्यू झाला आहे. सदरील ओढ्याची उंची अतिशय कमी असल्याने यामध्ये वारंवार वाहून जाण्याच्या घटना घडतात. येलकी येथील ग्रामस्थांना हाच रस्ता असल्याने यावरूनच ये-जा करावी लागते. तसेच याच ओढ्यावरूनच बाळापूर येथे ये - जा करावी लागते.