हिंगोली- जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यचे सत्र काही केल्या कमी होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. रविवारी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर सलग दुसऱ्या ही दिवशी पुन्हा एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे 6 वाजता उघडकीस आली. एका पाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे.बबन लक्ष्मण कऱ्हाळे वय वर्षे 32 असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हिंगोलीमध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच; तरुण शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या - farmer suicide news in hingoli
शेतकरी आत्महत्यांचे सत्र हिंगोली जिल्ह्यात सुरु आहे. सुभाष संभाजी भोजे याने रविवारी तर बबन कऱ्हाळे या शेतकऱ्याने सोमवारी आत्महत्या केली आहे.
कोरोनाच्या धास्तीने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या परिस्थितीतही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. रविवारी कऱ्हाळे डिग्रस पासून काही अंतरावर असलेल्या हिवरा जाटू परिसरात सुकळी येथील सुभाष संभाजी भोजे या कर्जबाजारी शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणाला कंटाळुन आपली जीवन यात्रा संपविली होती. या घटनेची आठवण जाते न जाते तोच दुसऱ्या दिवशी बबन कऱ्हाळे या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे.
जिल्ह्यात एक पाठोपाठ दुसरी शेतकरी आत्महत्या झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. घटनास्थळावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती.