हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. जय जाधव (वय 17) असे मृत तरुणाचे नाव आहे. जय अंघोळीला जात असताना त्याला विजेचा धक्का लागला अन् तो जागीच कोसळला.
विजेचा धक्का लागल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काही कळण्याच्या आत घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. बालपणी जय ज्या शाळेत शिकला त्या बालवाडीच्या शाळेत त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.