हिंगोली - संपूर्ण देशात महिलांच्या वतीने आगळ्या वेगळ्यापध्दतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोलीतही महिलांच्या वतीने विविध फळ आणि खाद्य पदार्थांपासून आकर्षक डिश बनवून महिला दिन साजरा करण्यात आला. यातील आकर्षक डिशची निवड करून त्या महिलेला नारी गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आले. आगळ्या वेगळ्या खाद्यपदार्थांच्या डिशने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
हिंगोलीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा - Various programs for women in Hingoli
हिंगोलीत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर फळ आणि खाद्य पदार्थांपासून विविध डिश बनवण्यात आल्या होत्या.
![हिंगोलीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा Women's Day was celebrated in Hingoli](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6346824-932-6346824-1583737197662.jpg)
जागतिक महिला दीना निमित्त हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती. महिलांनी केलेल्या कार्याचा सन्मान आणि महिलांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हिंगोली अर्बन परिवारांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध फळ, धान्यापासून आकर्षक पदार्थ बनवत डिश सजवण्यात आली होती. या डिश येजा करणाऱ्यांच्या नजरा खिळून घेत होत्या. महिला इतर महिलांना खाद्य पदार्थ बनविण्या संदर्भात ही मार्गदर्शन करत होत्या.
यावेळी महिलांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले, आपण जर काही ही मनात आणले तर आपण निश्चित यशस्वी होऊ शकतो, उगाच म्हणत नाहीत की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने मोठ्या जिद्दीने अन मेहनतीने आपल्या जोडीदाराला सहकार्य करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कलाकुसर बनविण्यासह घरगुती वागण्यासंदर्भात ही काही टिप्स दिल्या.