महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हातउसनी चांदी मागितल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा दाखल - महिलेचा विनयभंग हिंगोली

पीडितेने आरोपीला शेताची नांगरणी करण्यासाठी 20 तोळे चांदी सोयाबीनच्या बोलीवर दिली होती. त्यानुसार पीडित महिलेने सोयाबीनच्या सिजनवर चांदी मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती. मात्र, आरोपीने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तुझ्या सासू सासऱ्याकडे माझे पैसे आहेत. ते अगोदर दे, असे जोर जोरात ओरडून सांगत होता.

hingoli
हातउसनी चांदी मागितल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

By

Published : Dec 8, 2019, 6:03 PM IST

हिंगोली - माझ्या घरी चांदी मागायला का आली म्हणून महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना बासंबा पोलीस ठाणे हद्दीतील खेर्डा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा -कोणाच्या गळ्यात पडणार भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ? इच्छुकांच्या हालचालींना वेग

हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरच्या बलात्कार करून हत्या प्रकरणात आरोपीचे एन्काऊंटर केल्याने विनयभंग आणि बलात्कार करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण होईल, अशी शक्यता होती. मात्र, असे गुन्हे करणाऱ्या नराधमांना काही फरक पडत नाही. कपिल उर्फ सखाराम बाबासाहेब गडदे (रा. खेर्डा) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेने आरोपीला शेताची नांगरणी करण्यासाठी 20 तोळे चांदी सोयाबीनच्या बोलीवर दिली होती. त्यानुसार पीडित महिला सोयाबीनच्या सिजनवर चांदी मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती. मात्र, आरोपीने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तुझ्या सासू सासऱ्याकडे माझे पैसे आहेत. ते अगोदर दे, असे जोर जोरात ओरडून सांगत होता.

हेही वाचा -मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक सुरळीत; कंटेनर पल्टी झाल्याने खोळंबली होती वाहतूक

दरम्यान, पीडित महिला त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, आरोपी कपिल हा अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी कंटाळून पीडित महिला आपल्या घरी निघून आली. आरोपीने तिच्या घरात घुसून मारहाण केली आणि विनयभंग केला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बांसबा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अद्याप आरोपी मोकाट असून पीडित महिलेने आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. याबाबत पुढील तपास एन. बी. पोले करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details