हिंगोली -महिला या खरोखर खूपच व्यवहारिक असतात, मुख्य म्हणजे महिला जिद्दी अन कष्टाळू असतात. हेच दाखवून दिलं आहे हिंगोली तालुक्यातील अंधरवाडी येथील बचत गटांच्या महिलांनी. या बचत गटांमध्ये पंचावन्न महिला आहेत. त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे ती धान कलंजीयम फाउंडेशनने. या महिलांनी नेमकं काय केले? त्यांनी आपला व्यवसाय कसा यशस्वी केला पाहूयात स्पेशल रिपोर्ट.
सध्याच्या परिस्थितीत महिला व पुरुषांच्या हाताला कामच नसल्याने, बऱ्याच खेड्यापाड्यातील महिला या कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात जात असतात. कोणी ऊसतोडीसाठी तर कोणी हळद काढणीसाठी स्थलांतर करतात. मात्र गेल्या वर्षीपासून राज्यात कोरोनाचे सावट असल्याने अनेक महिला गावी परतल्या आहेत. गावी परतलेल्या अनेक महिलांनी बचत गटची स्थापना केली, मात्र नियोजनाचा अभाव, योग्य मार्गदर्शन न मिळणे, आर्थिक पाठबळ नसने अशा अनेक कारणांमुळे हे बचत गट यशस्वी होऊ शकले नाहीत. मात्र अंधरवाडी येथील महिला बचत गटांनी या सर्वांवर मात करत, कलंजियम फाऊंडेशनच्या मदतीने रोपवाटिका तयार केली आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांनी गरुडझेप घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
पॉलिहाऊसच्या निर्मितीसाठी 42 लाख 89 हजारांचा खर्च