हिंगोली- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र कायम आहे. हिंगोली-कळमनुरी रस्त्यावरील सावरखेडा येथे पडलेल्या खड्ड्याने आज एका महिलेचा बळी घेतला आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या अपघातात रेखा तुकाराम रायवडे (वय ३०) या महिलेचा मृत्यू झाला.
खड्ड्याचा बळी; गाडीवरून पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू - हिंगोली
खानापूर चिता ते सावरखेडा दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. तरीही संबंधित विभागाला अद्यापपर्यंत जाग आलेली नाही. अजून
![खड्ड्याचा बळी; गाडीवरून पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3282808-thumbnail-3x2-womendead.jpg)
पती-पत्नी कळमनुरीकडून जवळापळशीकडे दुचाकीने निघाले होते. मात्र, सावरखेडा येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून दुचाकी गेल्यानंतर पती तुकाराम रायवडे यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. यामुळे त्यांची पत्नी रस्त्यावर जोरात आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अति रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बासंबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. यावेळी रुग्णालयात राजकीय मंडळींनी एकच गर्दी केली होती. तर, याप्रकरणी महिलेच्या माहेरकडील मंडळीने पतीसोबत वाद घातला. जाणून-बुजून अपघात घडवून आणल्याचा आरोप माहेरकडील मंडळी पतीवर करत होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
खानापूर चिता ते सावरखेडा दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. तरीही संबंधित विभागाला अद्यापपर्यंत जाग आलेली नाही. अजून किती जणांचा बळी घेण्याची प्रतीक्षा हा विभाग करत आहे का? असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.