हिंगोली -प्रसूती झाल्यानंतर पाच तासातचं महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वसमत येथे घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
गंगासागर दुर्गादास कांबळे (वय 22) असे या मृत महिलेचे नाव आहे. 8 जून रोजी या महिलेला प्रसूतीसाठी वसमत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथे या महिलेची सिजेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. या महिलेने एका मुलाल जन्म दिला. प्रसूतीच्या साडे पाच तासानंतर अचानक तिच्या पोटामध्ये वेदना होत असल्याचे महिलेने सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी तिली एक इंजेक्शन दिले. त्यानंतर काही क्षणातच या महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेने महिलेचे नातेवाईक गोंधळून गेले. महिलेचा रात्री बारा वाजता मृत्यू झाला होता मात्र, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास रुग्णालयाच्यावतीने विलंब केला जात होता. महिलेला ताप आल्याचे कारण डॉक्टराने देत स्वॅब घेण्यासाठी मृतदेह ठेवल्याचे डॉक्टरांच्यावतीने सांगितले गेले. मृतदेह ताब्यात दिला जात नसल्याने नातेवाईकांनी आक्रोश करत रुग्णालयाचा परिसर दणाणून सोडला.