महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दीड वर्षाच्या चिमुरडीसमोरच गळफास घेऊन आईची आत्महत्या - हिंगोली आत्महत्या न्यूज

हिंगोलीमधील शिवणी खुर्द येथे आईने आपल्या दीड वर्षाच्या चिमुरडीसमोर आत्महत्या केली. चिमुरडीच्या रडण्याने कुटुंबीयांनी घरात धाव घेतली असता तिने आत्महत्या केल्याचे समजले. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jan 29, 2020, 8:04 AM IST

हिंगोली -आईने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीसमोरच घरातील पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले. कळमनुरी तालुक्यातील शिवणी खुर्द येथे ही घटना घडली असून रक्षदा अरविंद ढेंगळे (२४), असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर चिमुरडीकडे पाहून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दीड वर्षाच्या चिमुरडीसमोरच गळफास घेऊन आईची आत्महत्या

रक्षदा यांचे सासू सासरे नियमितपणे शेतात काम करण्यासाठी गेले होते, तर पती अरविंद हा कामानिमित्त कळमनुरी येथे गेला होता. रक्षदा ही आपल्या दीड वर्षीय चिमुरडीसह घरीच होती. शेतातून दुपारच्यावेळी सासू सासरे घरी परतले. त्यावेळी चिमुरडीचा रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे सासू सासऱ्याने घरात धाव घेतली, तर सून पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे सासू सासऱ्याने आरडाओरड करताच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाळ घेतली.

घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे पोलीस उपाधीक्षक अहमद गाणी, पोलीस निरीक्षक रंजित भोईटे, ज्ञानोबा मुलगीर, साहेबराव गायकवाड, श्यामराव गुहाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमनुरी येथील उपजिल्हारुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र, आत्महत्या करण्यामागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. चिमुरडीकडे बघून संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, कळमनुरी पोलीस अति बारकाईने तपास करीत आहे. आता पोलिसांच्या तपासात नेमके काय उघड होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, एका दिवसात दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details