महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत रानडुकरच्या हल्ल्यात पाचजण जखमी; दोन गंभीर - wild boar attack

शेतात काम करताना रानडुकराच्या हल्ल्यात पाचजण जखमी झाले आहेत. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असून एकाला 30 टाके पडले आहेत.

wild boar attackes in hingoli
शेतात काम करताना रानडुकराच्या हल्ल्यात पाचजण जखमी झाले आहेत.

By

Published : Mar 30, 2020, 8:33 PM IST

हिंगोली- शेतात काम करताना रान डुकराच्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असून एकाला 30 टाके पडले आहेत. तर, एकाला पुढील उपचारासाठी नांदेडला नेण्यान येणार आहे.

शेतात काम करताना रानडुकराच्या हल्ल्यात पाचजण जखमी झाले आहेत.
किसन सखाराम तनपुरे (50) लिंबाळा हुडी, साहेबराव आनंदराव पोले (50) पिंपरी लिंग, चतुराबाई गणेश कोकरे (45) सागर बाबाराव खरात (25) अन्नपूर्णा बाई गणेशराव पोले (30) अशी जखमींची नावे आहेत. तनपुरे हे शेतात हळद वेचणीचे काम करत होते.

दरम्यान, आठ ते दहा रानडुकरांचा कळप आला. यात एका डुकराने तनपुरे यांना धडक देऊन त्यांचा चावा घेतला. तर साहेबराव पोले हे देखील शेतात काम करत असताना रानडुकराने त्यांच्या पायाला चावा घेतला. यावेळी काही महिला गहू कापणीत व्यग्र होत्या. त्यांच्यावरही या डुकरांनी हल्ला चढवला. सध्या पोले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला नेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात गहू कापणी सुरू आहे. अशात रान डुकरांचे हल्ले झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित घटनेचा पंचनामा करून वन विभागाने नुकसानभरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details