हिंगोली -सेनगाव तालुक्यातील सवना येथे एका 78 वर्षीय महिलेला रॉकेल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली ( Hingoli Crime News ) आहे. स्वयंपाक करण्यास थोडा उशीर केल्याने हातपाय बांधून जाळल्याचे समोर आले ( Wife Burn Alive In Hingoli ) आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( Hingoli Goregaon Police Register FIR ) आहे.
सुंदराबाई कुंडलिक नाईक, असे मयत आजीचे नाव आहे. तर कुंडलिक शिवराम नाईक असे आरोपीचे नाव आहे. कुंडलिक शिवराम नाईक यांना पाच मुली असून, त्यांची लग्न झाली आहेत. त्यामुळे पती-पत्नी दोघेच घरी राहत. कुंडलिक नाईक यांचा स्वभाव रागीट होता. स्वयंपाक करण्यास थोडा उशीर केल्याने कुंडलिक नाईक यांनी पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून दिले.