हिंगोली -सध्याच्या परिस्थितीत भाजपकडून ईडी, सीबीआय चौकशी करण्याच्या धमक्यावर धमक्या दिल्या जात आहेत. यामुळेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. वसमत येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.
कार्यकर्त्यांच्याच बळावर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा उभा राहिल. विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी खात्रीने जिंकणार, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. 'एकदा का मुलगी सासरी गेली की, तिकडे ती सुखाने नांदतेच, या शब्दांत पक्ष सोडून जाणाऱ्यांचे सुळे यांनी कान उपटले. त्यांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर सडसडून टीका केली. वयोवृद्धाला देखील तरुणासमोर झुकावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. हे सरकार अजून किती गोरगरीब लोकांना डूबवणार आहे ? असा प्रश्नही उपस्थित केला.