महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत ऐन थंडीच्या दिवसात माणुसकीच्या भिंतीचा गरजवंताना आधार - ऐन थंडीच्या दिवसात माणुसकीच्या भिंतीचा आधार

आजच्याही धकाधकीच्या युगामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधी मानवाच्या मूलभूत असलेल्या गरजा आहेत. मात्र, गरीब परिस्थितीमुळे त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे अनेकांना कधीकधी याशिवाय आपले दिवस ढकलावे लागतात. कित्येक जण तर पैशाअभावी आपल्या आजारपणाचा उपचारही करून घेत नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते. म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून कपडे आणि इतर साहित्य गरजवंतांच्या पदरी पडत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे गोरगरीब आणि भिक्षेकरी मोठ्या संख्येने आहेत. मात्र, थंडीच्या दिवसात त्यांची अवस्था पाहवत नाही. या उपक्रमामुळे सर्वांना मदतीचा आधार मिळाला आहे.

walls of humanity supporting needy peopole in sangli during winter season
हिंगोलीत ऐन थंडीच्या दिवसात माणुसकीच्या भिंतीचा गरजवंताना आधार

By

Published : Dec 8, 2019, 9:25 AM IST

Updated : Dec 8, 2019, 12:33 PM IST

हिंगोली - येथील योग विद्या धाम समिती आणि औंढा नागनाथ येथील केशरी प्रतिष्ठानच्या वतीने नवनवीन सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात माणुसकीची भिंत हा मुख्य आकर्षण असलेला उपक्रम आहे. या उपक्रमा अंतर्गत दरवर्षी हिवाळ्यात गरजवंतांना आवश्यक ती कपडे आणि इतर साहित्य पुरविण्यात येते. उपक्रमामध्ये बरेच जण सहभागी होऊन नको असलेले वस्तू, कपडे या ठिकाणी देतात आणि गरजवंत आपल्या गरजेनुसार त्याचा लाभ घेतात.

हिंगोलीत ऐन थंडीच्या दिवसात माणुसकीच्या भिंतीचा गरजवंताना आधार

यावर्षी या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपक्रमामुळे खरोखरच गरजवंतांना उबदार व आवश्यक ती कपडे मिळत असल्याने पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी समाधान व्यक्त केले. तसेच उपक्रम राबवत सर्वसामान्यांना मदत केली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह योग विद्या धाम चे सदस्य उपस्थित होते. तर गरजवंतांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमची पावती असल्याचं प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा -कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; चांगले दर मिळत असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

आजच्याही धकाधकीच्या युगामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधी मानवाच्या मूलभूत असलेल्या गरजा आहेत. मात्र, गरीब परिस्थितीमुळे त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे अनेकांना कधीकधी याशिवाय आपले दिवस ढकलावे लागतात. कित्येक जण तर पैशाअभावी आपल्या आजारपणाचा उपचारही करून घेत नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते. म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून कपडे आणि इतर साहित्य गरजवंतांच्या पदरी पडत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे गोरगरीब आणि भिक्षेकरी मोठ्या संख्येने आहेत. मात्र, थंडीच्या दिवसात त्यांची अवस्था पाहवत नाही. या उपक्रमामुळे सर्वांना मदतीचा आधार मिळाला आहे.

हेही वाचा -कांद्याच्या भाववाढीने पर्यटकांच्या संख्येत घट; गोव्याच्या मंत्र्यांचा दावा

तसेच योग विद्या धामच्या समितीच्या वतीने मागील 2 वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये नगर पालिकेचे कर्मचारी आणि योग विद्या धामचे सदस्य सहभागी होतात. साहित्य आणि कपडे वाटप करतात. येथे रेल्वे स्थानकावर असलेल्या भिक्षुकांना उपक्रमातुन आवश्यक त्या वस्तू कपडे पुरविण्याचा प्रयत्न केला जातो. हा उपक्रम वर्षभर सुरु ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, यासाठी जागा न मिळाल्याची खंत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली.

Last Updated : Dec 8, 2019, 12:33 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details