हिंगोली- कोरोनाशी झुंज देताना काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना धक्काच बसला. ज्या-ज्या गावात राजीव सातव यांनी भेट दिली तेथील ग्रामस्थांना हा धक्का असह्य झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांनी अक्षरशः हंबरडा फोडून सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला.
राजीव सातवांच्या निधनाने राजकारणात मोठी पोकळी; गावागावातील नागरिकांना अश्रू अनावर - हिंगोली जिल्ह्या राजीव सातव निधन प्रतिक्रिया
गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाला सुरुवात केली आहे. त्यांचे राजकरण हे फार वेगळे होते, त्यांची भेट घेण्यासाठी कोणीही गेले तर भेट झाली नाही, असे कधी झाले नाही. त्यांचा अनुभव खूप जणांना फास जवळून घेतला आहे. ते सर्वसमन्यापासून ते कार्यकर्ता सर्वांवर प्रेम करत असत, प्रत्येकांच्या अडचणी ऐकून घेत त्यावर तोडगा काढत असत, असा नेता पुन्हा होणे नाही
राजू सातव हे तळागाळातील असून, गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाला सुरुवात केली आहे. त्यांचे राजकरण हे फार वेगळे होते, त्यांची भेट घेण्यासाठी कोणीही गेले तर भेट झाली नाही, असे कधी झाले नाही. त्यांचा अनुभव खूप जणांना फास जवळून घेतला आहे. ते सर्वसमन्यापासून ते कार्यकर्ता सर्वांवर प्रेम करत असत, प्रत्येकांच्या अडचणी ऐकून घेत त्यावर तोडगा काढत असत, असा नेता पुन्हा होणे नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते डॉ.भानुदास वामन यांनी दिली.
ह्रदय हेलवणारी घटना-
सातव यांच्या निधन ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आहे. राजीव सातव हे खरोखरच संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेते होते. त्यांच्या जाण्याने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. हे कधी न भरून निघणारे नुकसान झाले आहे. दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी जो कोणी भेटीस जात असे, त्यांची मोठ्या आपुलकीने ते विचारपूस करत असत, भेट झाली नाही तर पीएला अडचण दूर करण्यासाठी सूचना देत असत. त्यांच्या मृत्यूची बातमी ही धक्कादेणारी घटना असल्याची भावना अॅड धम्मदीपक खंदारे यांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांना अश्रू अनावर
राजू सातव यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वच जण हादरून गेले आहेत. त्यांची भेट घेतलेल्याना धक्का बसला आहे. त्यानी मालसेलू येथे भेट दिली होती, तेव्हा नेता काय असतो हे सातव यांच्या माध्यमातून दिसून आले आहे. त्यांनी भेटी दरम्यान दिलेली आश्वासन ते पूर्ण करत असत, त्यांच्यावर जनता खरोखरच प्रेम करीत असे, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधी न भरून निघणारी असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ नेते गंगारामजी भिसे यांनी दिली.