हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण काळजी घेत आहेत. शहरी भागात घेतली जाणारी खबरदारी आता ग्रामीण भागात घेतली जात आहे. घोटा देवी येथील ग्रामस्थांनी तर जास्तच काळजी घेतलेली दिसत असून, गावाच्या वेशीवरच एक सॅनिटायझर केंद्र उभारले आहे. तसेच येथे स्वतःचे निर्जंतुकीकरण करुन घेण्यासाठी ग्रामस्थ लांबलचक रांगा लावत आहेत.
निर्जंतुकीकरण करुन घेण्यासाठी ग्रामस्थ रांगेत... हिंगोलीतील घोटा देवी गावातील प्रकार हेही वाचा...लेकीला वाचवण्यासाठी आईनेही घेतली पाण्यात उडी; दोघींचाही मृत्यू..
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना रुग्णांची आकडेवारी घालमेल वाढवत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने, याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन गतीने काम करत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातही मोठी खबरदारी घेतली जात आहे. हिंगोली मधील घोटा देवी या ग्रामपंचायतीने गावाच्या वेशीवर सॅनिटायझर केंद्र उभारले आहे. गावामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर निर्जंतुकीकरण करणाऱ्या औषधींचा स्पिंकलर स्प्रे लावण्यात आला. त्याद्वारे ग्रामस्थांना निर्जंतुकीकरण केले जात आहे.
शेतात जाणाऱ्या व्यक्तींना किंवा शेतातून परत आलेल्या व्यक्तीला निर्जंतुकीकरण कक्षातून जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा गावातील नागरिकांना या केंद्रावर निर्जंतुकीकरण करुन घेण्यासाठी येत आहेत. सकाळपासूनच शेताकडे जाणाऱ्या नागरिकांच्या रांगा या केंद्रावर लागलेल्या असतात.
शहराप्रमाणेच आता ग्रामपंचायत स्तरावर देखील कोरोनाला हरवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. घोटा देवी येथील ग्रामपंचायतीचा उपक्रम जिल्ह्यातील इतरही ग्रामपंचायतीने उपयोगात आणला तर निश्चितच या महाभयंकर आजाराला थोपवता येऊ शकेल.