हिंगोली - सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथे कार्यरत असलेला ग्रामसेवक पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतींबधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. शिंदेनी तक्रारदारकडे भावाच्या नावाची मालमत्ता 140 मधील जागा वाटणी पत्राद्वारे करून देण्यासाठी व तसा फेर करून देण्यासाठी 1500 रुपयाची लाच मागितली होती. अमोल शिंदे असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.
पंधराशे रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिपरी येथील ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने पकडले. मालमत्ता १४० मधील जागा वाटणी पत्राद्वारे आणि तसा फेर करून देण्यासाठी मागितली होती लाच.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे धाव घेतली अन तक्रार दिली. लाचलुचपत विभागाकडून 18 सप्टेंबरला तक्रारीची पडताळणी केली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून ग्रामसेवक शिंदेंना पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
अनेक दिवसांपासून ग्रामसेवक विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी संपावर होते. नुकत्याच काही मागण्याला सरकारने मंजुरी दिली असून, ग्रामसेवकानी संप मागे घेतल्यानंतर ते ग्रामपंचायत कार्यालयात रुजू झाले आहेत. रुजू होताच ग्रामसेवक अमोल शिंदेने आपल्या कार्याला बऱ्यापैकी सुरुवात केली होती. मात्र पहिल्याच प्रयत्नात फसल्याने ग्रामसेवकामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षिका अर्थना पाटील,पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी ममता अफूने,पोनी नितीन देशमुख यांच्यासह पथकाने केलीय.