हिंगोली - सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी तसेच अन्य मागण्यांसाठी गाव विक्रीस काढले आहे. तीन दिवस झाल्यानंतरही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसून, राजकीय पुढाऱ्यांनीही गावाकडे पाठ फिरवली असल्याने स्थनिक शेतकऱ्यांनी जनावरांना रस्त्यावर बांधून आंदोलन सुरू केले आहे.
'गाव विकायला आहे' - गावकऱ्यांकडून आंदोलनाला पुन्हा सुरुवात - सेनगाव तालुका
गाव विक्रीस काढण्याच्या घटनेला तीन दिवस उलटल्यावरही कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने किंवा राजकीय पुढाऱ्याने या घटनेची दखल घेतलेली नाही. यामुळे ग्रामस्थ गुरा-ढोरांसह रस्त्यावर उतरले आहेत.
गावकऱयांकडून आंदोलनाला पुन्हा सुरूवात
तीन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आंदोलनाला सुरुवात केली होती. आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला आहे.