महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष - vidhan sabha election 2019 result

हिंगोली विधानसभा मतदारसंघात आघाडी आणि महायुती यांच्यात अंत्यत अशी चुरशीची लढत झाली. पहिल्या फेरी पासूनच महायुतीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे हे आघाडीवर होते. सहाव्या फेरीत मात्र त्यांची लीड कमी होत होत गेली. नंतर आठव्या फेरी पासून पुन्हा लीड वाढत गेली तर ती शेवटच्या फेरी पर्यंत ती कायम राहिली. ९ व्या फेरीपर्यंतच्या लीड पासूनच भाजप कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाके फोडून जल्लोष करण्यास सुरुवात केली.

हिंगोलीत मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

By

Published : Oct 24, 2019, 5:04 PM IST

Updated : Oct 24, 2019, 6:13 PM IST

हिंगोली- संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवघरे तर कळमनुरी सेनेचे संतोष बांगर आणि हिंगोली विधानसभा मतरदार संघात भाजपचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे विजयी झाले आहेत. त्यामुळे हिंगोली येथे मतमोजणी केंद्राबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

हिंगोली विधानसभा मतदारसंघात आघाडी आणि महायुती यांच्यात अंत्यत अशी चुरशीची लढत झाली. पहिल्या फेरी पासूनच महायुतीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे हे आघाडीवर होते. सहाव्या फेरीत मात्र त्यांची लीड कमी होत होत गेली. नंतर आठव्या फेरी पासून पुन्हा लीड वाढत गेली तर ती शेवटच्या फेरी पर्यंत ती कायम राहिली. ९ व्या फेरीपर्यंतच्या लीड पासूनच भाजप कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाके फोडून जल्लोष करण्यास सुरुवात केली.

हिंगोलीत मतमोजणी केंद्राच्या बाहेर जल्लोष करताना भाजप कार्यकर्ते

दुसरीकडे कळमनुरी विधानसभा मतदार संघात सेनेचे उमेदवार संतोष बांगर यांचा १५ हजार ७१६ मताच्या लीडने विजय झाला. या ठिकाणी देखील शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खर तर हा मतदार संघ म्हणजे राजीव सातव काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या विधानसभेत मात्र, चित्र पूर्णतः पलटले असून, सातवांच्या बालेकिल्ल्यात यंदा भगवा फडकला आहे. यंदाच्या निवडणुकीत डॉ. संतोष टारफे यांचा दारुण पराभव झाला. या भागात कोणतेच विकास कामे न केल्याचाच फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसला आहे.

वसमत विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाली असून, एका टर्मनंतर पुन्हा हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहिलेला आहे. या मतदारसंघात भाजपचे बंडखोर शिवाजी जाधव यांनी प्राणपणाला लावून मतदारांच्या अडचणी सोडविल्या होत्या. एवढेच काय तर धान्याच्या रूपात देखील मदत केली होती. मागेल ती सेवा पुरविणाऱ्या शिवाजी जाधव यांना मतदारानी फटकारले आहे. तर वंचीतही या ठिकणी तोडकी पडली.

अधून मधून लीड ही कमी जास्त झाली होती. त्यामुळे नेमका उमेदवार कोण हे छाती ठोक पणे शेवटपर्यंत सांगताच येत नव्हते. ९ ते १० व्या फेरी नंतर मात्र या राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवघरे यांना लीड मिळत गेली अन शेवट पर्यंत ती लीड कायम राहिली. शेवटी ८ हजार मताच्या लीडने राजू नवघरे यांचा विजय झाला.

Last Updated : Oct 24, 2019, 6:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details