हिंगोली - गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आखाडा बाळापूर येथे चोरांनी दागिन्याचे दुकान फोडले. मात्र, त्याचवेळी गस्त घालत असलेले पोलीस तिथे आले. परंतु, त्यांच्यावर दगडफेक करुन चोरांनी २ लाखांचे दागिने घेऊन धूम ठोकली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांवरच दगडफेक करत चोरांनी लंपास केले २ लाखांचे दागिने - akhada balapur police
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आखाडा बाळापूर येथे चोरांनी दागिन्याचे दुकान फोडले. मात्र, त्याचवेळी गस्त घालत असलेले पोलीस तिथे आले परंतु, त्यांच्यावर दगड फेक करुन २ लाखांचे दागिने घेऊन धूम ठोकली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
![पोलिसांवरच दगडफेक करत चोरांनी लंपास केले २ लाखांचे दागिने](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4033395-thumbnail-3x2-hingoli.jpg)
आखाडा बाळापूर येथील मराठवाडा चौकात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यानी बोंढारे ज्वेलर्सचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. आणि दुकानातील दागिन्यांवर डल्ला मारला. दागिने पळून नेताना सुरक्षा रक्षकास मारहाण केली. एवढ्या मध्यरात्री सुरक्षा रक्षकास होत असलेली मारहाण पाहून गस्तीवर असलेले पोलीस शिपाई गणेश राहिरे, जमादार अंकुश शेळके यांनी त्यांच्याकडे जीप वळवली. जीपमधून कर्मचारी उतरून चोरट्यांना पकडण्यासाठी धाव घेतात तोच चोरट्यांनी त्यांच्यावर दगड फेकायला सुरुवात केली. तरीही पोलिसांनी त्या चोरट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केले मात्र अंधाराचा फायदा घेत चोर पळून गेले. याची चर्चा जिल्ह्यात जोरदार रंगत आहे.
तसेच दागिन्याच्या दुकानाजवळच असलेल्या एका फोटो स्टुडिओ मध्ये चोरी करून एक कॅमेरा, १२ हजार रूपये आणि एक हार्ड डीस्क चोरी केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी बाळापूर पोलीस तपास करत असून, चोरट्यांचे चेहरे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे लवकरच पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचू शकणार असल्याचे पोलीस निरीक्षक राहिरे यांनी सांगितले.