हिंगोली- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आजपासून (दि. 6 ऑगस्ट) कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे गोर गरिबांचे प्रचंड हाल होणार असल्याने, प्रत्येकांच्या खात्यावर दहा हजार रुपये टाकण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र, काहीही न केल्याने शेवटी आज वंचितच्या कार्यकर्त्यांनी चपलाचे दुकान सुरू करून लॉकडाऊन तोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हिंगोली शहर व जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. याचा फटका रोजंदारीवर काम करणार मजूर, गरीब वर्गाला बसणार आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लॉकडाऊन जाहीर करा पण, गरिबांच्या खात्या दहा-दहा हजार रुपये टाका, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
'लॉकडाऊन' झुकारुन सुरू केले दुकान, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक
हिंगोली जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दुकान उघडून जिल्हा प्रशासनाविरोधात निदर्शने केली.
VBA
याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणतीच हलचाल झाली नाही. मात्र, लॉकडाऊन सुरू झाला. यामुळे याचा विरोध करण्यासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी शहरातील गांधी चौकात निदर्शने करत एक दुकान सुरू केले. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नेमके कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला अन मागणीला कितपत यश येतय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.