महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईव्हीएम हटाव देश बचाव; वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन

संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर घंटानाद करून ''ईव्हीएम हटाव देश बचावचा'' नारा देण्यात येत आहे.

By

Published : Jun 17, 2019, 7:34 PM IST

वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन

हिंगोली - संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर घंटानाद करून ''ईव्हीएम हटाव देश बचावचा'' नारा देण्यात येत आहे. हे अनोखे आंदोलन हिंगोली जिल्ह्यातही करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारावर दिवसभर घंटानाद करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.

वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन


ईव्हीएम ही मशीन असून ती हॅक होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर घंटानाद केला. यावेळी 'ईव्हीएम हटाव देश बचाव'च्या घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या घंटानाद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details