हिंगोली- पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात लाजीरवाणी ( bad incident in progressive Maharashtra ) घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील सावरखेडा येथे गायरान जमिनीत निळा झेंडा लावल्याने मागासवर्गीय समाजावर गावातील विशिष्ट लोकांनी बहिष्कार टाकल्याची धक्कादायक ( Upper community boycotted the backward community )घटना घडली आहे. दलित समाजातील लोकांना धान्य दळण दळून दिले जात नाही. तसेच दुकानांमध्ये सामान दिले जात नाही. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पोलीस अधिक्षकाकडे तक्रार ( Vanchit Bahujan Aghadi Police complaint ) दाखल केली आहे.
सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथे असलेल्या गायरान जमिनीवर गावातील एका विशिष्ट समाजाने ताबा करीत तेथे स्मशानभूमी व मंगल कार्यालय ( Savarkheda land dispute issue ) उभारले आहे. त्या पाठोपाठ येथील मागासवर्गीय समाजाने उर्वरित गारायन जमिनीवर बौद्ध मंदिर बांधण्याच्या उद्देशाने निळा झेंडा ( Blue flag for Budha Temple construction ) रोवला. याचाच राग मनात धरून येथील विशिष्ट जातीमधील लोकांनी मागासवर्गीय लोकांवर बहिष्कार टाकला आहे.
मागासवर्गीयांना या सेवेपासून ठेवले जात आहे वंचित
सावरखेडा येथील गिरणीवरील दळण मागासवर्गीय समाजासाठी बंद करण्यात आले आहे. तसेच गावात असलेल्या हनुमान मंदिरावर विशिष्ट मंडळींनी बैठक घेऊन
मागासवर्गीय समाजाला दुकानावरील सामान देणे बंद केले. एवढेच नव्हे तर वाहनाने प्रवास देखील नाकारण्यात आला. गावातील विशिष्ट समाजाने एवढ्यावर न थांबता गावात परगावावरून येणाऱ्या दुकानदारालाही मागासवर्गीय समाजाला किराणा सामान न देण्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे मागासवर्गीय लोकांनवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.