हिंगोली -दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यातील वातावरणात प्रचंड बदल जाणवत आहे. अशा स्थितीमध्ये शनिवारी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह वसमत तालुक्यातील पारडी बागल या भागातील केळी पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वसमत तालुक्यात सिंचनक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते, त्या पाठोपाठ कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा या भागातही केळीची लागवड केली जाते. मात्र दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. अशातच दोन दिवसापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये केळी पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
कोरोना पाठोपाठ अवकाळी पावसाचाही फटका
आधीच कोरोनामुळे शेतकरी हैराण आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. अशात आता अवकाळी पावसासारख्या दुसऱ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. केळीची 300 ते 400 रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री केली जात आहे. पूर्वी हाच दर दीड ते दोन हजार एवढा प्रतिक्विंटल इतका होता. आता मात्र अतिशय कवडीमोल दराने विक्री करण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
आर्थिक फटका