हिंगोली - सेनगाव तालुक्यातील हता नाईक तांडा परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या डोहातील पाण्यात एका अनोळखी तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळला आहे. यासंबंधी माहिती मिळताच सेनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, घातपाताचा संशय असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
हता नाईक तांडा परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या डोहामध्ये एका तरुणीचे कपडे तरंगत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यानंतर काही लोकांनी डोहाजवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांना महिलेचा मृतदेह असल्याचे आढळले.