महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत अज्ञात व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या - हिंगोलीत अनोळखी व्यक्तीची आत्महत्या

डीग्रस कराळे फाटा येथून जवळच असलेल्या हिवरा शिवारात रस्त्याच्याकडेला एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांनी घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली.

unknown-person-commited-suicide-in-hingoli
हिंगोलीत अनोळखी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू

By

Published : May 10, 2020, 1:29 PM IST

हिंगोली- एका अनोळखी व्यक्तीने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. तालुक्यातील डिग्रस कराळे फाट्यावर ही घटना घडली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

डीग्रस कराळे फाटा येथून जवळच असलेल्या हिवरा शिवारात रस्त्याच्याकडेला एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हा मृतदेह रस्त्यावरून दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली.

मात्र हा मृत व्यक्ती नेमका कोण आहे, हे अजून तरी कळू शकले नाही. शिवाय, त्याच्याकडे कोणता ओळखीचा पुरावा देखील नसल्याने ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. घटनेचा पंचनामा सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details