हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील दोन तरुणांना महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा चोरून व्हिडिओ बनवणे आणि तो व्हिडिओ टिकटॉक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल करणे चांगलेच महागात पडले आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात या दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
आरिफ खान करीम खान पठाण, अमेर उर्फ अम्मू अमीर खान अब्दुल गफार खान पठाण अशी या दोन तरुणांची नावे आहे. हे दोघेही जवळा पांचाळ येथील रहिवासी आहेत.
चोरून व्हिडिओ काढल्यामुळे आणि टिकटॉकवर प्रसारित केल्यामुळे हिंगोलीत दोन तरुणांना अटक हेही वाचा... राज्यात आपलेच सरकार, एनआरसी कायदा लागू होऊ देणार नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही, मागील काही दिवसांपासून गावातील बसस्थानक परिसरात बसून अर्धापूर येथे खासगी शिकवणीला ये-जा करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर पाळत ठेवत होते. एवढेच नव्हे तर तिला छेडण्याचा देखील प्रयत्न केला होता. हे दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी त्या विद्यार्थिनीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिने याचा विरोध केला असता, आरोपींनी तिचा चोरून व्हिडिओ बनवला.
हेही वाचा... आमदार संजय शिरसाठ व उपमहापौर जंजाळने शिवसेनेच्या ठेकेदारास बदडले, गुन्हा दाखल
त्यांनी तो व्हिडिओ टिकटॉक आणि व्हॉट्सअॅपवर प्रसारित केला. हा प्रकार 1 डिसेंबर ते 18 जानेवारी 2020 या कालावधीत घडला. त्यानंतर पीडितेने याबाबत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना जवळा पांचाळ येथून ताब्यात घेतले. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.