हिंगोली- दुचाकीवरून आलेल्या दोघानी एका बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या नरसी फाट्याजवळ घडली असून यात बसच्या काचा फुटून चालक जखमी झाला आहे. या प्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोलीत एसटी बस फोडली; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - s.t bus strike by unknown people
सकाळी साडेनऊच्या सुमारास बस क्र.(एम.एच.२०,३३५४) ही औंढाकडून हिंगोलीकडे ४४ प्रवासी घेऊन येत होती. मात्र, अचानक नरसी फाट्याजवळ एका दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून बसच्या काचांवर दगडफेक केली. यामध्ये बसेसच्या दोन्ही काचा फुटल्या असून त्यात १५ ते २० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आज जिल्ह्यात बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात आला होता. मात्र याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. तर, जिल्ह्यातील काही मुस्लिम संघटनांनी बंदमध्ये सहभागी होत आपली दालने बंद ठेवली होती. इतरांनी मात्र आपली दुकाने चालू ठेवल्याचे पहावयास मिळाले. बस सेवा सकाळपर्यंत सुरळीत सुरू होती. मात्र, सकाळी साडेनऊच्या सुमारास बस क्र.(एम.एच.२०,३३५४) ही औंढाकडून हिंगोलीकडे ४४ प्रवासी घेऊन येत होती. मात्र, अचानक नरसी फाट्याजवळ एका दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून बसच्या काचांवर दगडफेक केली. यामध्ये बसेसच्या दोन्ही काचा फुटल्या असून त्यात १५ ते २० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी बस चालक काशिनाथ डोरले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता या दोन अज्ञातांचा या बंदशी काही संबंध आहे का? याचा शोध ग्रामीन पोलिसांकडून घेतल्या जात आहे.
हेही वाचा-भारत बंद : मनमाड नांदगावमध्ये कडकडीत बंद; भव्य रॅली करून निषेध