महाराष्ट्र

maharashtra

हिंगोलीतील मारोती साळवेंच्या खूनप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

वसमत तालुक्यातील रांजोना येथील मारोती साळवे हे ४ जूनपासून बेपत्ता झाले होते. या प्रकरणी हट्टा पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात साळवे यांचा परभणीतील ताडकळस येथे खून झाल्याचे स्पष्ट झाले. हट्टा पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

By

Published : Jun 8, 2020, 7:38 PM IST

Published : Jun 8, 2020, 7:38 PM IST

maroti salave
मारोती साळवे

हिंगोली -वसमत तालुक्यातील रांजोना येथून बेपत्ता झालेल्या मारोती साळवे या व्यक्तीचा परभणीतील ताडकळस येथे खून झाल्याची घटना 7 जून रोजी उघडकीस आली. या प्रकरणी हट्टा पोलिसांनी रांजोना येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. नेमका खून कशासाठी केला, याची चोकशी सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी सांगितले.

मारोती डिगाजी साळवे हे 4 जूनला कुटुंबातील कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होते. नातेवाइकांनी त्यांचा खूप शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी 6 जूनलाहट्टा पोलीस ठाण्यात साळवे हरवल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने हट्टा पोलीस साळवे यांचा शोध घेत होते.

याच सुमारास परभणी जिल्ह्यातील ताडकळस येथे एका व्यक्तीचा मृतदेह तलावात आढळला होता. त्यामुळे ताडकळस पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. ही बाब हट्टा पोलिसांना कळल्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. तेव्हा तो मृतदेह साळवे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रांजोना येथून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details