हिंगोली - संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी आहे. त्याच अनुषंगाने हिंगोली नगरपालिकेने प्लास्टिक बंदीसाठी मोहीम राबवून हिंगोलीतील अनेक दुकानदारांवर कारवाई ही केली. प्लास्टिक न वापरण्यासंदर्भात आवाहनही केले होते. मात्र, पालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून साठा केला होता. या साठा केलेल्या प्लास्टीकवर पथकाने छापा टाकला. या छाप्यात अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे प्लास्टिक जप्त केले. हे प्लॉसिटिक मोठ्या प्रमाणात असल्याने ते घेऊन जाण्यासाठी पोलिकेची वाहने कमी पडू लागली होती. यातापर्यंत पालिकेने केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
हिंगोलीत दोन लाखाचे प्लास्टिक जप्त; नगरपालिकेच्या पथकाची कारवाई - हिंगोली नगरपालिका बद्दल बातमी
हिंगोली नगरपालिकेने प्लास्टिक बंदी मोहीमे अंतर्गत शहरातील एका गोडाऊनवर कारवाई केली. या कारवाईत २ लाख किमतीचे प्लास्टीक नगरपालीकेने जप्त केले.
कारवाईमध्ये प्लास्टिक द्रोण, प्लास्टिक पत्रावळी, ग्लास, चमचा जेवणावळीचे साहित्य जप्त केले. वास्तविक पाहता यापूर्वी पालिकेच्यावतीने प्लास्टिक वापरावर बंदी करण्यासंदर्भात जनजागृतीही केली आहे. एवढेच नव्हे तर या गोडाऊन च्या मालकाला पालिकेच्या पथकाने यापूर्वी सूचना देखील दिलेल्या होत्या. मात्र, त्या सूचनांकडे या गोडावून मालकाने दुर्लक्ष केले. त्यामुळेच याठीकाणी छापा मारण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले.
या कारवाईने मात्र प्लास्टिक विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पथकाने इतर ही दुकानावर छापे टाकून तपासणी केली. आता या गोडाऊन मालकावर पालिका किती रुपयांचा दंड आकारणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कारवाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, स्नोबर तस्लिमा, स्वछता निरीक्षक बाळू बांगर, डी. पी. शिंदे, मस्के आदीनी केली.