हिंगोली- शहरात दोन कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांनी दिली. तर तातडीची बैठक घेऊन सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या असल्याचे श्रीवास यांनी सांगितले.
हिंगोलीत आढळले २ कोरोनाबाधित संशयित रुग्ण हेही वाचा-कोरोनाचा धसका : बिहारमधील शिवहर जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू
संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने भीतीचे वातावरण पसरले आहे. आता हिंगोलीतही कोरोनाचे दोन संशयित आढळले आहेत. त्यातील एक पुण्याहून हिंगोली येथे आलेला आहे. तर दुसरा दुबईतून हिंगोलीत आला. दोघांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या दोन्ही रुग्णांच्या रक्ताचे नमूने प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.
दोन संशयित आढळल्याने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू झाली असून, जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीवास रुग्णांचा आढावा घेत आहेत. तर संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या रुग्णांचा संपर्क कोणा-कोणा सोबत आला आहे. याचा आरोग्य विभागाच्या वतीने आढावा घेतला जात आहे. कोरोना व्हायरस बाबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने शल्यचिकित्सक श्रीवास यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोनाची लक्षणे जाणवत असतील तर टोल फ्री नंबरवर संपर्क साधल्यास संबधित रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करू,अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.