महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत वेगवेगळ्या घटनांमध्ये गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी शिवारात मालेगाव येथील अडत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 11 जून रोजी उघडकीस आली. दुसरीकडे वसमत तालुक्यातील सोना येथील महिलेनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 10 जूनला उघडकीस आली आहे.

हिंगोली आत्महत्या न्यूज
हिंगोली आत्महत्या न्यूज

By

Published : Jun 12, 2020, 2:38 PM IST

हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी शिवारात मालेगाव येथील अडत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 11 जून रोजी उघडकीस आली. तर दुसरीकडे वसमत तालुक्यातील सोना येथील महिलेनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 10 जून रोजी सायंकाळी 6 वाजता उघडकीस आली आहे. दोन्ही घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.

योगेश गंगासा गोरे (रा. मालेगाव जि. वाशिम) असे मृत अडत्याचे नाव आहे. त्यांच्या डोक्यावर कर्ज असल्याने त्यांना वारंवार धमकीचे फोन येत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे. तसेच, एक वेळ त्यांची दुचाकी देखील अडवण्यात आली होती. त्यामुळे ते मागील अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. ते 10 जून रोजी घरातून कुणालाही काहीही न सांगता बाहेर पडले होते. नातेवाईकांनी त्यांचा बराच शोध घेतला. मात्र, ते कुठेही सापडले नाहीत. अखेर मालेगाव येथील पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

गोरे यांचा मृतदेह हा कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी शेत शिवारातील नाल्याजवळ आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसानी धाव घेऊन मृतदेहाच पंचनामा केला आणि शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी कौशल प्रशांत कान्हेड यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक गायकवाड करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत मीराबाई गोविंद जाधव (वय 24, रा. सोना ता. वसमत) असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेने स्वतःच्या घरात बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्यचे कारण अजून अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून, मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लागोपाठ जिल्ह्यात दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details