हिंगोली - सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील अंगणवाडी सेविकांनी या पोषण आहारात हेराफेरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलांची पटसंख्या वाढवून सांगणे, कमी आणि अनियमित घरपोच आहार वाटप करणे, अशा तक्रारींची दखल घेऊन अंगणवाडी सेविका पुष्पलता बंड आणि ज्योती उचितकर यांना सेवेतून कायमस्वरुपी कमी करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविकांनी खाल्ला चिमुकल्यांचा खाऊ; दोघींचे निलंबन तर, दोघींच्या वेतनात कपात - pushpalata band
सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील अंगणवाडी सेविकांनी या पोषण आहारात हेराफेरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलांची पटसंख्या वाढवून सांगणे, कमी आणि अनियनित घरपोच आहार वाटप करणे अशा तक्रारींची दखल घेऊन अंगणवाडी सेविका पुष्पलता बंड यांना सेवेतून कायमस्वरुपी कमी करण्यात आले आहे.
महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांच्याकडे दोन ऐवजी एकाच महिन्याचा घरपोच आहार वाटप केल्याची तक्रार आली होती. या तक्रारीची दखल घेत सदर कारवाई करण्यात आली. याव्यतिरीक्त, मदतनिस अनुसया वानरे आणि प्रतिभा धावळे यांचे एका महिन्याचे मानधन कपात करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे अंगणवाडी सेविकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आणखी काही अंगणवाडी सेविकांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात ही पहिलीच कारवाई आहे. अजून काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.