हिंगोली- जिल्ह्यातील वसमत येथे 15 हजार रुपये मागण्याच्या आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी रात्री 7 च्या सुमारास घटना घडली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा पाठलाग करून ताब्यात घेतले.
शेख मुजाहिद्द शेख जनिमिया (रा. गणेशपेठ, वसमत), अस मृताचे नाव आहे. तर अमजत खान उर्फ बाबा आताउल्ला खान पठाण (रा. खाजीपुरा, वसमत), सय्यद अलीम सय्यद सत्तार (रा. कोहीनूर कॉलनी, वसमत), अशी आरोपींचे नाव आहे. आरोपींनी 9 सप्टेंबरला सायंकाळी 7 च्या सुमारास मृत शेख मुजाहिद्द यांच्या सोबत 15 हजार रुपये मागण्याच्या कारणावरून जोराचे भांडण केले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपीने थेट चाकूने सपासप वार केले. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या, शेख शाहरूख शेख कलीम, शेख साजिद शेख खाजा यांना देखील चाकूचा मार लागला होता. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता.
वसमत येथे झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी पाठलाग करून दोघांना केली अटक - hingoli latest news
जुन्या वादातून व पैशामुळे 9 सप्टेंबरला एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी आज पुर्णा नदीच्या पुलावरून पाठलाग करत अटक केली आहे.
या प्रकरणी मृताच्या नातेवाइकांने दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, ते आरोपी परभणी, जिंतूर येथून एका लाल रंगाच्या दुचाकीवरून औंढा नागनाथकडे येत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी लाल रंगाच्या दुचाकीवरून औंढा नागनाथकडे येताना दोघांना पूर्णा नदी जवळ पाठलाग करून ताब्यात घेतले. विचारणा केली असता, त्यांनी खून केल्याची कबुली दिली.
हेही वाचा -'तुम्ही निस्वार्थपणे सेवा करा, फळ तुम्हाला आपोआप मिळते'