हिंगोली -वसमत तालुक्यातील मोहगाव येथे पोळ्यानिमित्त गावातून बैल फिरवत असताना बैलाने लाथ मारल्यामुळे एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. गजानन बालाजी माने (१२) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बैलाने लाथ मारल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू; मोहगाव येथील खळबळजनक घटना - gajanan bajali mane
वसमत तालुक्यातील मोहगाव येथे पोळ्यानिमित्त गावातून बैल फिरवत असताना बैलाने लाथ मारल्यामुळे एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. गजानन बालाजी माने (१२) असे मृत मुलाचे नाव आहे.

बैलाने लाथ मारल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू
बैलजोडी पोळा फुटल्यानंतर गावांमधील फिरवत असताना अचानक बैलाने गजाननला लाथ मारली. यामध्ये तो जागीच कोसळला. तात्काळ नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून गजाननला मृत घोषित केले.
पोळा हा शेतकऱ्याचा अगदी मोठा सण मानला जातो. मात्र, आज घडलेल्या घटनेमुळे मोहगावसह संपूर्ण जिल्हात शोककळा पसरली आहे. पोळा फुटल्यानंतर घरोघर फिरून आपल्या बैलजोडीला घास भरविला जातो. पण, ही घटना घडल्यानंतर कुणीही घरोघर बैलजोडी फिरवली नाही.