महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा.. व्यापारी अन् हमाल यांच्या बंद आंदोलनामुळे शेतमाल बाजारात पडून - हिंगोली व्यापारी बंद

मुसळधार पावसामुळे पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यातच जो काही शिल्लक राहिलेल्या शेतमालाला बाजारात मात्र कवडी मोल भाव मिळत आहे. व्यापाऱ्यांनी धान्याची वर्गवारी करुन शेतकऱ्यांची लूट चालवली आहे.

व्यापारी अन् हमाल यांच्या बंद आंदोलनामुळे शेतमाल बाजारात पडून

By

Published : Nov 16, 2019, 10:13 AM IST

हिंगोली -मुसळधार पावसामुळे पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यातच जो काही शिल्लक राहिलेल्या शेतमालाला बाजारात मात्र कवडी मोल भाव मिळत आहे. व्यापाऱ्यांनी धान्याची वर्गवारी करुन शेतकऱ्यांची लूट चालवली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या हमाल मापाडी संघटनेच्या उपोषणामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेती मालाची खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

व्यापारी अन् हमाल यांच्या बंद आंदोलनामुळे शेतमाल बाजारात पडून

हेही वाचा - 'या' खनिजाचा राजस्थानात आढळला प्रचंड साठा; आयातीऐवजी भारत भविष्यात करणार निर्यात

वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कामकाज करणाऱ्या हमाल व मापाड्याने कामाचे नवीन दर मान्य न केल्यामुळे हमाल मापाडी संघटनेच्या वतीने मागील पाच दिवसापासून काम बंद व बेमुदत उपोषण सुरू केले आहे. लोकप्रतिनिधीही आळीपाळीने उपोषणकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. मात्र, अजून तरी कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेकऱ्यांना नाईलाजास्तव हमाल मापाडी व व्यापाऱ्यांचा तिढा सुटण्याची प्रतिक्षा करित आपला शेतमाल उघड्यावर टाकण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेकऱ्यांकडून व्यापारी हमाली वाढवून घेतात आणि आम्हाला कमी देत असल्याचा आरोप हमाल मापाडी संघटनेच्यावतीने केला जात आहे. नवनिर्वाचित आमदार राजू नवघरे यांनी या उपोषणकर्त्यांना भेट दिली तरी हा तिढा कायम आहे. विशेश बाब म्हणजे व्यापाऱ्यांनीही बंद सुरू केला आहे.

उपोषणाच्या बाबतीत माहीत नसलेल्या एका शेतकऱ्याने वाहनात बाजारा समितीमध्ये माल भरून आणला. तर तो उतरवण्यासाठी कोणीही दिसले नाही म्हणून चालक व सोबत आलेल्या कामगाराने पोते उतरवले तर उपोषणकर्त्यांनी त्याला दम भरला. हे प्रकरण पोलिसापर्यँतही पोहोचले. त्यामुळे दिवसेंदिवस तिढा वाढतच जात आहे.

हेही वाचा - राज्यात भाजपचेच सरकार, मुख्यमंत्री आमचाच - चंद्रकांत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details